वर्ल्ड कपचा वचपा काढण्यासाठी न्यूझीलंड सज्ज; सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरूद्ध निर्णायक लढत

मुंबई | 2019 साली विश्वचषकाच्या फायनलमध्ये झालेल्या रोमांचक लढाईत इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करत विश्वचषक आपल्या नावावर केला होता. विश्वचषक इतिहासातील सर्वांत रोमांचक लढाई म्हणून या सामन्याकडे पाहिलं गेलं.

आता आज पुन्हा हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. विश्वचषकाचा वचपा काढण्यासाठी न्यूझीलंड सज्ज झालेला आहेत. तर इंग्लंड देखील न्यूझीलंडला पुन्हा पराभवाची धूळ चारण्यास तयार आहे.

युएईमधील तिन्ही ठिकाणच्या फलंदाजीसाठी अबुधाबीमधील मैदान सर्वोत्कृष्ट ठरलं आहे. आजही खेळपट्टी सारखीच असलण्याची शक्यता आहे. खेळपट्टी स्टेडियमच्या मधोमध असल्यामुळे फलंदाजांना लक्ष्य करण्यासाठी लहान बॅन्ड्रिज राहणार नाही.

बॅन्ड्रिज लहान नसल्याने गोलंदाजांना थोडेफार काम करायला लागेल. त्यामुळे या मैदानात फलंदाजांवर मोठी मदार असणार आहे.

दोन्ही संघात आतापर्यंत 21 टी-ट्वेंटी सामने झाले आहेत. त्यामधील 13 सामने इंग्लंडने जिंकले आहेत तर न्यूझीलंडने 7 जिंकले आहेत. तर सामना अनिर्णीत राहिला.

टी-ट्वेंटी विश्वचषकात, इंग्लंडने पाच सामन्यांपैकी तीन जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने दोन वेळा जिंकल्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे आता आजचा सामना जिंकून न्यूझीलंड हिशोब बरोबर करण्याच्या तयारीत आहे.

जेसन रॉयच्या दुखापतीमुळे इंग्लंडने त्याच्या जागी डेव्हिड विलीसारखा अष्टपैलू खेळाडू घेतल्यात आलं आहे. त्यामुळे आता इंग्लंडचं पारडं काही अंशी जड झालं आहे.

हा टी-ट्वेंटी विश्वचषक येऊन खूप दिवस झाले आहेत. त्यात सहभागी होणं हा आमच्यासाठी रोमांचकारी आहे. साहजिकच हा खेळ लवकर संपतोय. आम्हाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे, असं केन विल्मसन म्हणाला आहे.

आमच्या संघात सर्वकाही ठीक चाललं आहे. हा सामना जिंकून आम्ही फायनलला पोहचू असं विश्वास देखील त्याने यावेळी व्यक्त केला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या आव्हानाबद्दल आणि त्यापाठोपाठ मिळणाऱ्या संभाव्य संधीबद्दल हे खेळाडू खूप उत्सुक आहेत. पण त्यांना पराभूत करण्यासाठी आम्हाला खरोखर चांगले क्रिकेट खेळावे लागेल, असं इयाॅन माॅर्गनने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“…आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीये”

 नवाब मलिक यांनी अखेर हायड्रोजन बाॅम्ब फोडला; देवेंद्र फडणवीसांवर केले गंभीर आरोप

मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी

आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर