कोरेनाचे थैमान! भारतातील करोनाबाधितांची संख्या पोहचली 30 वर

दिल्ली: इराणहून नुकत्याच परतलेल्या गाझियाबादमधील एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे समोर आले. त्यामुळे भारतातील करोनाबाधितांची संख्या 30 वर पोहचली आहे.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी शीघ्र प्रतिसाद पथके स्थापण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून दिल्ली सरकारकडून विविध पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून देशाच्या राजधानीतील सर्व शाळांमधील प्राथमिक वर्ग 31 मार्चपर्यंत बंद ठेवले जाणार आहेत.

भारतात नोंद झालेल्या करोनाबाधितांमध्ये राजस्थानात पर्यटनासाठी आलेल्या 16 इटालियन पर्यटकांचाही समावेश आहे. त्याशिवाय, परदेशांत असणाऱ्या 17 भारतीयांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

त्यामुळे विमानतळांवर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. करोनाच्या फैलावाचे सावट जगभरातील घडामोडींवर पडले आहे. भारत आणि युरोपीय संघाची पुढील आठवड्यात होणारी शिखर परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जनाची नाही किमान मनाची तरी…; मनसेची उद्धव ठाकरेंवर विखारी टीका

-“ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी सरकार सकारात्मक”

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता कुणीही पत्राला उत्तर दिलं नाही- अण्णा हजारे

-कोकणचं नैसर्गिक वैभव जगासमोर आणणार; उद्धव ठाकरेंची ग्वाही

-कोरोनाच्या प्रतिबंधासाठी ट्रम्प यांनी दिली तब्बल ‘इतक्या’ निधीला मंजुरी