मोबाईल वापरणाऱ्यांनो जरा सावधान, कारण…

मुंबई| सध्या जगभरात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत ३ हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. भारतात २५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांना कोरोना विषाणूचा धोका असल्याचं इंग्लंडमधल्या साऊथप्टन विद्यापीठातले प्राध्यापक विल्यिम कीविल यांनी सांगितलं. स्मार्टफोनचा वापर केल्यावर चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी हात व्यवस्थित धुवा. कारण स्मार्टफोनच्या स्क्रीनवरही कोरोना विषाणू असू शकतो, अशी माहिती कीविल यांनी दिली.

स्टील आणि तांब्याच्या पृष्ठभागावर कोरोनाचा विषाणू २ तासांपर्यंत जिवंत राहतो, अशी माहिती अमेरिकेतल्या आजार नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (सीडीसी) देण्यात आली आहे. कार्डबोर्ड आणि प्लास्टिकवर हा विषाणू बराच काळ तग धरतो.

मानवी शरीराच्या बाहेर 9 दिवस कोरोनाचा विषाणू जिवंत राहू शकतो. अल्कोहोल वाईप्सनं स्मार्टफोनची स्क्रीन स्वच्छ केल्यास कोरोनाचा विषाणू मरतो. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरनं हात धुवावेत, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘किस घेणं बंद करा’; आरोग्यमंत्र्यांचे देशातील नागरिकांना आदेश

-अहो, हे सरकार उलट्या दिशेने का जात आहे?; विनायक मेटेंचा सरकारला सवाल

-लक्षात ठेवा, प. बंगालमध्ये राहणारा प्रत्येक बांगलादेशी भारतीय नागरिक आहे- ममता बॅनर्जी

-लक्षात ठेवा, प. बंगालमध्ये राहणारा प्रत्येक बांगलादेशी भारतीय नागरिक आहे- ममता बॅनर्जी

-सावधान…. भारतात कोरोणाग्रस्तांची संख्या 28 वर; केंद्रिय आरोग्यमंत्र्यांची माहिती