सावधान! दारू पिऊन गडकिल्ल्यांवर धिंगाणा घालाल तर 6 महिने जेलमध्ये जावं लागेल…

मुंबई | राज्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर दारु पिऊन धिंगाणा घातल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दारु पिऊन गैरकृत्य करणाऱ्यांना 6 महिन्यांचा सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

जर असं गैरकृत्य पुन्हा एकदा झालं तर त्यांच्या शिक्षेचा कालावधी 1 वर्षाचा असेल. गड किल्ल्याचे पावित्र्य कायम राखण्यासाठी राज्याच्या गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं गडप्रेमींनी स्वागत केलं आहे. महाराष्ट्रात गडकिल्ल्यांना महत्वाचं स्थान आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी पर्यटक, अभ्यासक गडावर येत असतात.

दरम्यान, दारुबाजारांवर पोलीस तसेच उत्पादन शुल्क विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. शिक्षेबाबतच्या तरतुदी सर्व गडकिल्ले आणि पुरातन वास्तूंच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांनी गोंधळलेला अर्थसंकल्प मांडला- जयंत पाटील

-मोदी सरकारच्या बजेटवर रोहित पवारांचं टीकास्त्र; म्हणाले ‘हा तर गंडवागंडवीचा अर्थसंकल्प’!

-“नशिब ही गोष्ट जेवणापुर्ती मर्यादित राहिली नाहीतर गांधीजींच्या आत्म्यानं स्वर्गात आपलं चैतन्य गमावलं असतं”

-अहो आव्हाडजी, अदिवासींच्या घरात खुर्च्या, टिपोय, मिनरल वॉटर कुठून आलं?

-सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात असहकार; नगरमधील इसळक ग्रामपंचायतीचा ठराव