‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटावर कॉपीराईटची टांगती तलवार!

मुंबई | ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या नावामुळे सध्या सोशल मीडियावर याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटातील ‘सविता भाभी’ या पात्राच्या नावाचा उल्लेख हद्दपार होणार आहे.

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटात ‘सविता भाभी’ हे पात्र आहे. या पात्राचा चित्रपटात अनेक ठिकाणी उल्लेख आहे. मात्र हा उल्लेख आता टाळावा लागणार आहे. सविता भाभी हे एका कॉमिकमधलं काल्पनिक पात्र आहे. या काल्पनिक पात्राचे कॉपीराईट निलेश गुप्ता यांच्याकडे आहेत.

कॉपीराईट्स माझ्याकडे असताना माझ्याकडे असतानादेखील चित्रपट निर्मात्यांनी कोणतीही परवानगी घेतली नाही, असं निलेश गुप्ता यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निलेश गुप्ता यांनी या पात्राच्या कॉमिक कॉपीराईटवरून चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर पाठवली होती.

महत्वाच्या बातम्या- 

-“भारत सध्या आणीबाणीच्या परिस्थितीशी झुंजतोय, अन तुमचं चाललंय तरी काय?”

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडणार विधानसभा उपाध्याक्षपदाची माळ?

-दिराने माझा मानसिक आणि लैंगिक छळ केला; सुन डॉ. गौरी चव्हाणांचा गंभीर आरोप

-काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींना अज्ञातांकडून मारहाण

-शेण आणि गोमूत्रामुळे कोरोना रोखता येवू शकतो; भाजप आमदाराचा अजब दावा