शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा तर तानाजींच्या चेहऱ्यावर शहांचा फोटो; पहा व्हिडीओ

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आणि तानाजी मालुसरे यांची तुलना गृहमंत्री अमित शहा यांच्याशी करण्यात आली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाॅलिटिकल किडा या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा तर तानाजी यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच उदयभान राठोड यांच्या चेहऱ्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावण्यात आला आहे.

या प्रकारामुळे महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली असून हा व्हिडीओ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच सायबर सेलला टॅग करुन कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, ‘तानाजी द अनसंग वाॅरिअर’ हा चित्रपट तिकीट बारीवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाची वाटचाल 200 कोटींच्या दिशेने होत आहे.

 

 महत्वाच्या बातम्या- 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजय देवगण मंगळवारी ‘तानाजी’ चित्रपट पाहण्यासाठी येणार एकत्र

-1 जून पासून देशात लागू होणार ‘एक देश एक रेशन कार्ड’

‘तुकडे तुकडे गँग’ अस्तित्वात नाही; गृह मंत्रालयाची कबुली

-सांगलीच्या महापौर-उपमहापौरांचा राजीनामा; राजीनाम्यानंतर महापौरांना अश्रू अनावर

-बाळासाहेबांनी हे खपवून घेतलं नसतं; आव्हाडांच्या त्या वक्तव्यावर राम कदम संतापले