मुंबई | इतिहासात पहिल्यांदाच पर्यटन खात्याला 1 हजार कोटींहून अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. यावेळी पवारांनी ही घोषणा केली आहे.
सध्या पर्यटन खात्याचा पदभार आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच त्यांना पहिल्याच झटक्यात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते. आता त्यांना चांगले काम करता यावे यासाठी पर्यटन खात्याचा निधी वाढवण्यात आला आहे.
वरळीत पर्यटन संकुल उभारण्यात येणार आहे. तसंच वन विभागासाठी 1630 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त पर्यावरण विभागासाठी 230 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यटन स्थळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी विधीमंडळात दिली आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पात नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठीही मोठी घोषणा करण्यात आली असून अशा शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर देण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आमदारांना लॉटरी; अर्थसंकल्पात अजित पवारांनी केली मोठी घोषणा
-अर्थसंकल्पात कुणाला काय काय मिळालं?; वाचा एका क्लिकवर
-राज्यातील 80 टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
-बळीराजाला हेलपाटे न मारावे लागता आमच्या सरकारनं कर्जमाफी दिली- अजित पवार
-नियमीतपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांचा दिलासा