देशातील सर्वात स्वस्त CNG कार लाॅन्च, मायलेज तर विचारूच नका…

मुंबई | मागील काही वर्षात भारतात मारूती सुझुकी सर्वात लोकप्रिय कार ठरली आहे. तरूणांमध्ये मारूती सुझुकीची मागणी जास्त असते. जर गाडी घेण्याचा विचार करत असाल तर खास मारूती सुझुकी एका नव्या स्वरूपात बाजारात येत आहे.

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता सर्वत्र सीएनजी या पर्यायाचा वापर केला जातोय.

मारुती सुझुकीने सोमवारी अपडेटेड व्हर्जनमध्ये Celerioचा CNG प्रकार लॉन्च केला आहे. हे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अनेक अपडेट्ससह गाडी लाॅन्च करण्यात आली होती.

सध्या, ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात इंधन कार्यक्षम पेट्रोल कार मानली जाते. मारुती सेलेरियो आता ज्या ग्राहकांना सीएनजी गाडी देखील उपलब्ध करून दिली आहे.

गेल्या पाच वर्षांत त्यांच्या वाहनांच्या विक्रीत 22 टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. देशात फॅक्टरी फिटेड सीएनजी कार लॉन्च करण्यात मारुती सुझुकी आघाडीवर आहे.

पॉवर 1 लिटर ड्युअल-जेट ड्युअल VVT सोबतच सिरीज इंजिनही येत आहे. जे 60-लिटर क्षमतेच्या CNG टँकसह जोडलेलं असेल.

Celerio CNG चे मायलेज 35.60 km/kg असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. म्हणजेच बाइकच्या एवढंच मायलेज देणारी कार असल्याचं कंपनीने सांगितलंय.

एक्स-शोरूममध्ये Celerio CNG ची किंमत 6.58 लाख रूपये ठेवण्यात आली आहे. भारतात कार लाॅन्च झाल्यापासून आतापर्यंत 25000 बुकिंग देखील झाल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“नाना पटोलेंची जीभ… 1 लाख रूपये बक्षिस देणार”; भाजप नेत्याची खुली धमकी

“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका

“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं” 

“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?”