नवी दिल्ली | गत काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Prices Hike) किंमती स्थिर होत्या. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल महागण्याचा अंदाज आता खरा ठरत असल्याचं पहायला मिळतंय.
मोदी सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे LPG सिलेंडरच नाही तर सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीही लवकरच वाढण्याची शक्यता आहे.
पेट्रोलच्या किंमतीने अनेक राज्यात शंभरी गाठली आहे. तर एलपीजी गॅस सिलेंडरही हजारावर पोहचलाय. अशातच आता सीएनजी-पीएनजी आणि एलपीजी सिलेंडर पुन्हा वाढणार असण्याची चिन्हे आहेत.
नैसर्गिक वायूच्या दरात केलेल्या वाढीची नवीन किंमत 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती वर्षातून दोनदा सुधारल्या जातात. आता ऑक्टोबरमध्ये किंमत सुधारित केली जाईल.
दरम्यान, अमेरिका, कॅनडा आणि रशिया यांसारख्या प्रमुख वायू उत्पादक देशांमध्ये जाहीर होणाऱ्या वार्षिक सरासरी किंमतींच्या आधारावर येथे नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित केल्या जातात.
महत्त्वाच्या बातम्या –
Nitin Gadkari: इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ठाकरे सरकारने दिलं गुडीपाडव्याचं खास गिफ्ट
पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ आदेश
Raj Thackeray: “आठवावे रुप…हिंदूस्वरुप!”, राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेचा टीझर रिलीज
Coffee Benefits: काॅफी प्या मस्त रहा! कॉफी पिणाऱ्यांना ‘या’ आजारांचा कमी धोका