आता कोरोना लस मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार, ‘या’ दोन लसींना DCGI ची परवानगी

नवी दिल्ली | मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. कोरोनावर एकमेव असा प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाकडे पाहिलं जातंय.

अशातच आता मागील 12 महिन्यांपासून सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेला आता वेग आल्याचं पहायला मिळतंय. भारतात तब्बल 139 कोटी लोकांचं लसीकरण झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती.

अशातच आता भारतात सर्वात जास्त वापर झालेल्या Covishield आणि Covaxin या दोन लसींना ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने खुल्या बाजारात विक्रीसाठी मान्यता दिली आहे.

त्यामुळे आता Covishield आणि Covaxin या दोन लसी लवकर मेडिकल शाॅपमध्ये पहायला मिळतील. या दोन्ही लसींची किंमत 275 रूपये असण्याची शक्यता आहे. यावर कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

लसींच्या किंमतीवर सर्विस चार्ज लागण्याची देखील शक्यता आहे. सध्या खुल्या बाजारात Covaxin  लस 1200 रूपयांनी मिळत आहे. तर Covishield चा एक डोस 780 रुपयांना मिळत असल्याचं दिसत आहे.

या दोन्ही लसी खुल्या बाजारात मिळाव्यात यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे मागणी करण्यात आली होती. त्यावर आता परवानगी देण्यात आली आहे.

या दोन्ही लसी आता रूग्णालयात आणि मेडिकल स्टोरमध्ये मिळण्याची शक्यता आहे. ही लस तुम्ही डाॅक्टरांकडून टोचवून घेऊ शकता.

दरम्यान, उर्वरित लोकांचं लसीकरण पुर्ण व्हावं, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता सरकारच्या डोक्यावरचा भार देखील कमी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

टीम इंडियात दोन खतरनाक ऑलराउंडर्सची एन्ट्री; क्षणात मॅच पलटवण्याची क्षमता

मालेगावात काँग्रेस ऑलआऊट! महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“…तर भाजप राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घेणार का?”

 “तो फोटो कुणी काढला?, हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा”

“दोन व्यक्तींची मनं आता नितीन गडकरीच जुळवू शकतात”