नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातल्या दारूच्या दुकानांबाहेर लांबच लाबं रांगा लागल्या होत्या.
छत्तीसगडमध्येही दारूची खरेदी करण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. त्यामुळे ही गर्दी कमी व्हावी या उद्देशाने छत्तीसगड सरकारने दारूची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्तीसगड सरकारने राज्यात दारूची होम डिलीव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. एक ग्राहक एकावेळी 5000 ml पर्यंतच्या दारूची ऑनलाइन ऑर्डर करू शकतो. याचे होम डिलिव्हरी शुल्क 120 रुपये असणार आहे.
दरम्यान, दारू खरेदीसाठी लागणाऱ्या रांगा, त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती यामुळे आता दारूची ऑनलाईन विक्री करण्याचा विचार दारुची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना
-ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा
-अंबानी कुटुंबाने खूप मदत केली, त्यांच्या मदतीशिवाय हा प्रवास पूर्ण झाला नसता- नीतू कपूर
-“इस्रायल कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर”
-“नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भक्तांकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का?”