पुरुषांच्या ‘या’ सवयीमुळे होतोय स्पर्मवर परिणाम, लगेचच सवय सोडून द्या

नवी दिल्ली | कोरोना काळात मोठमोठ्या कंपन्यांना फटका बसला. मात्र, कोरोना काळात आयटी सेक्टर मात्र, जोमानं चालू होतं. याच काळात वर्क फ्राॅम होमची संकल्पना प्रकर्षाने समोर आली.

अनेकांना घरूनच काम करावं लागलं. त्यामुळे सतत लॅपटाॅप आणि मोबाईलशी जुळवून राहणं गरजेचं बनलं होतं. आताही अनेकजण मोबाईल आणि इलेक्टाॅनिक वस्तूंचा जास्त वापर करतात.

मागील काही वर्षांपासून मोबाईलमुळे पुरूषांच्या स्पर्मवर परिणाम होत असल्याचं संशोधनातून समोर येत होतं. अशातच आता आणखी एका संशोधनातून यावर शिक्कामोर्तब झाल्याचं पहायला मिळतंय.

दक्षिण कोरियातील संशोधकांनी 4,280 शुक्राणूंचे नमुने असलेल्या 18 संशोधन नमुन्यांच्या विश्लेषण केलं आहे. मोबाइलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी स्पर्मला हानी पोहोचवतात, त्यामुळे पुरुषांनी मोबाइलचा वापर कमी करावा, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

आधुनिक जीवन पुरुषांच्या शुक्राणूंसाठी चांगलं असू शकत नाही, परंतु मोबाइल फोन हे शुक्राणूंची संख्या आणि गुणधर्मांना मारक आहे हे पूर्णपणे स्पष्ट नाही, असं मत वैज्ञानिकांनी व्यक्त केलं होतं.

काही काळापूर्वी जिनिव्हातील एका शास्त्रज्ञाने आणि ऑस्ट्रेलियातील जगातील आघाडीच्या आयव्हीएफ क्लिनिकने 40 हजारांहून अधिक शुक्राणूंच्या चाचण्यांचे विश्लेषण करून असा दावा केला होता.

वयानुसार शुक्राणूंची गुणवत्ता कमी होत जाते, असं चाचण्यांच्या माध्यमातून समोर आलं होतं. 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये शुक्राणूंची कमी संख्या सर्वात सामान्य आहे. यामुळे, महिलांना गर्भधारणेमध्ये समस्या देखील येतात.

दरम्यान, 40 टक्क्यांहून अधिक रीप्रोडक्शनची प्रकरणं पुरुषांच्या इनफर्टिलिटीशी संबंधित आहेत. त्यामुळे वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेणं देखील गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

कडाक्याच्या थंडीमुळे उद्भवतात समस्या; अशी लक्षणं दिसताच घ्या डाॅक्टरांचा सल्ला

Omicron किती वेळ जिवंत राहू शकतो?, अभ्यासातून सर्वात मोठा खुलासा झाला

सचिन तेंडूलकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला “आता उशीर झालाय पण, रोहित-राहुलची जोडी…”

मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार?; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं…