महाराष्ट्र मुंबई

पुढच्या 15 वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही- चंद्रकांत पाटील

मुंबई : युती सरकारने गेल्या पाच वर्षात राज्यात केलेल्या विविध विकासकामांमुळे जनतेच्या मनात भाजपविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे इतर पक्षातील नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

प्रत्येक शहरी आणि ग्रामीण भागातील विकासकामांचा अनुभव सामान्य नागरीक घेत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना भाजपमध्ये प्रवेश करावा वाटतो. आगामी 15 वर्षात राज्यात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळणार नाही, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या बोधचिन्हाचे अनावरण चंद्रकांत पाटलांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

गेल्या पाच वर्षांत राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र ३४ लाख हेक्टरवरून वाढून ४० लाख हेक्टर झाले. सिंचनाप्रमाणेच विविध क्षेत्रात विकास झाला असल्याचंही पाटलांनी सांगितलं आहे.

आपल्या भागातील विकास करण्यासाठी नेत्यांना भाजपमध्ये यावंस वाटतं. भाजपमध्ये घाणेरडं राजकारण होत नाही. याची इतर पक्षांना जाणीव झाली आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

माजी केंद्रीयमंत्री आणि माजी राज्यपाल राम नाईक पुन्हा राजकारणात सक्रिय असून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्रीही उपस्थितीत राहतील, असंही पाटलांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-शिवेंद्रराजेंनी पवारांना अव्हेरलं; आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, उद्या भाजपत प्रवेश!

-फोडाफोडीच्या राजकारणानंतरही शरद पवार आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर

-‘दिव्यांग प्रवासी डब्या’तून गरोदर महिलाही प्रवास करु शकतात…; अमित ठाकरेंच्या मागणीला यश

-विखेंना शह; सत्यजीत तांबे यांची शिर्डीतून उमेदवारीची मागणी

-पुलवामा हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मॅन वर्सेस वाईल्ड’च्या शूटींगमध्ये व्यस्त???

IMPIMP