पुढचा मुख्यमंत्री कोण हे मला काय विचारता?- राज ठाकरे

मुंबई |  महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलीये. पण निवडणुकीआधीच पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? या चर्चांनी जोर धरलाय. सेना भाजपमध्ये याच मुद्द्यावरून जोरदार कलगीतुरा रंगलाय. यावरच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी राज ठाकरे यांना छेडण्याचा प्रयत्न केला.

राजसाहेब पुढचा मुख्यमंत्री कोण होईल असं तुम्हाला वाटतं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर चिडून  पुढचा मुख्यमंत्री कोण हे मला काय विचारता? असं राज यांनी उत्तर दिलं.

राज ठाकरे आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. ते नेहमीच आपल्या ठाकरी शैलीत सत्ताधाऱ्यांवर आणि वेळ पडेल तेव्हा विरोधकांवर आसूड ओढतात. याची प्रचिती संबंध महाराष्ट्राला लोकसभेला अनुभवायला मिळाली.

सध्या शिवसेना भाजपात मुख्यमंत्रीपदावरून कलगीतुरा रंगतो आहे. याच मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी रविवारी(काल) भाष्य केले. मी तर सांगितलं आहे, मी पुन्हा येणार आहे.. काळजी करू नका…  परंतू मित्रपक्षाकडे बोलायची खुमखुमी असणारे नेते जास्त आहेत. तसे आपल्यात पण काही नेते आहेत, असं म्हणत त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला.

शिवसेनेकडून आदित्य यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढं केलं जात आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार, अशी गर्जना केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना मुख्यमंत्रीपदावरून छेडण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या बातम्या-

अजित पवारांच्या वाढदिवशी बारामतीत ‘मुर्दाबाद’च्या घोषणा! पाहा व्हीडिओ-

-उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय पण पंतप्रधान झालेलं पाहायचंय- तानाजी सावंत

-पाकिस्तानला निघून जावं; ‘हा’ अभिनेता आझम खानवर भडकला

-राणेसाहेब… पराभवाची हॅट्रीक चुकवायची असेल तर निवडणूक लढवू नका; शिवसेनेचा सल्ला

-कर’नाटकावर’ उद्धव ठाकरेंचा सामनातून हल्लाबोल; म्हणतात…