मुंबई | महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारात जाऊन पोहोचला. शिवसेनेनं 16 बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटीसीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
इतकंच नाही तर दोन तृतीयांश आमदार आमच्याकडे असल्याने आम्हीच खरी शिवसेना असा दावाही शिंदे गटाने केला. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून यावर आज सुनावणी पार पडली.
आजच्या सुनावणीत दोन्ही पक्षांना म्हणणं मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 27 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. तर या प्रकरणावरील पुढील सुनावणी ही 1 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
सर्वोच्च न्यायलयाच्या या निकालावरच शिवसेना व शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या प्रकरणाचा 1 तारखेला तरी निकाल लागणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना मंगळवार पर्यंत न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तर आजची सुनावणी आता 1 ऑगस्ट रोजी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बाळासाहेबांनाही आम्हीच पक्षात आणलं असंही ते म्हणतील’, संजय राऊत आक्रमक
शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार?, आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी
संजय राऊत हाजीर हो! राऊतांना ईडीचा तिसऱ्यांदा दणका
“पूर्वीचे सुलतान मंदीरं पाडायचे आणि आताचे सुलतान शिवसेना पाडत आहेत”
नवाब मलिकांना दिलासा नाहीच, ईडीचा मलिकांना आणखी एक झटका