मुंबई | कुख्यात अंडरवर्ल्ड गुंड (Underworld Don) आणि मुंबई 1993 साखळी बॉम्बस्फोटातील अरोपी दाऊद इब्राहीम कासकर (Dawood Ibrahim Kaskar) याला पकडण्यासाठी पोलीस आणि इतर भारतीय गुप्तचर संघटना गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत.
आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने (NIA) दाऊदला आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी बक्षीसांची घोषणा केली आहे. दाऊदला पकडून देणाऱ्याऱ्या एनआयए 25 लाख बक्षीस देणार आहे.
मुंबईतील 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोटासोबतच शस्त्रांची तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, बनावट नोटा प्रकरण, हवाला पद्धत आणि दहशतवादी हल्ले अशा अनेक प्रकरणांत दाऊद आरोपी आहे.
पाकिस्तानी यंत्रणांच्या मदतीने हल्ले घडवून आणल्याचा दाऊदवर मोठा आरोप आहे. यामुळे दाऊदला पकडण्यासाठी भारत सरकार सज्ज झाले आहे. एनआयएने दाऊदला पकडण्यासाठी बक्षिसे जाहीर केली आहेत.
एनआयएच्या गुप्त वृत्तानुसार दाऊदचा भाऊ अनीस इब्राहीम उर्फ हजी अनीस, दाऊतचा सहकारी जावेद पटेल उर्फ जावेद चिकना, शकील शेख उर्फ छोटा शकील यांच्यासोबत इब्राहीम मुश्ताक अब्दुल रझाक मेमन उर्फ टायगर मेमन यांना पकडून देण्यासाठी देखील बक्षिसे जाहीर केली आहेत.
दाऊदला पकडून देणाऱ्याला 25 लाख, छोटा शकीलसाठी (Shakeel Shaikh) 20 लाख तर अनीस (Anish Ibrahim), चिकना (Javed Chikana) आणि मेमनला (Tiger Meman) पकडून देणाऱ्याला प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. दाऊद सध्या पाकिस्तानातील कराचीत (Karachi, Pakistan) वास्तव्यास आहे.
भारतातील मोस्ट वॉन्टेड आरोपिंच्या यादीत दाऊदचे नाव अग्रस्थानी आहे. लष्कर ए तोयबाचा प्रमुख हफीज सय्यद, जैश ए मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूर अझर, हिजबूल मुझाहिद्दीनचा संस्थापक सैयद सलाहुद्दीन आणि त्याचा जवळचा सहकारी अब्दुल रौफ असगर यांच्या यादीत दाऊद देखील आहे.
महत्वाच्या बातम्या –
शिवसेनेच्या ‘दसरा मेळाव्याबाबत’ नारायण राणेंचा मोठा दावा, म्हणाले…
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे रहाणार का? शशी थरुर म्हणाले…
“ईडीच्या भितीने राज ठाकरे भाजपसोबत जवळीक साधत आहेत, आणि…”; किशोरी पेडणेकरांची मोठी टीका
झारखंडचे मुख्यमंत्री आणि आमदार छत्तीसगढला अज्ञातस्थळी गेले; सांगितले ‘हे’ कारण