Top news खेळ

निकोलस पूरनने यंदाच्या आयपीएलमध्ये केलाय असा पराक्रम, जो कुणालाही जमला नाही!

नवी दिल्ली | २०२० च्या मोसमातील आयपीएल सामना काल पार पडला. हा सामना दुबईतील इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला गेला. आयपीएलमधील १३ व्या मोसमातील काल २२ वा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला.

हा सामना सनरायजर्स हैदराबाद यांनी ६९ धावांनी जिंकला. पण यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या एका खेळाडूने एक नवा विक्रम केला. त्या खेळाडूच नाव आहे निकोलस पूरन.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध निकोलस पूरन यांनी सुरवातीलाच फटकेबाजी करत सुरवात केली. निकोलस पूरन यांनी फक्त १७ चेंडूत अर्धशतक केलं. यामध्ये त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

निकोलस पूरन यांनी सहा षटकार मारत आयपीएल मोसमातील सर्वात जलद अर्धशतक केले. किंग्ज इलेव्हन पंजाबने गोलंदाजी करताना त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागला.

पण जेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबची फलंदाजी आली, तेव्हा निकोलस पूरन यांनी जोरदार फटकेबाजी करत सामन्याची सुरवात केली. किंग्ज इलेव्हन पंजाबला एका बाजूने तीन बळींचा झटका बसला.

त्यानंतर निकोलस पूरन यांनी सर्वांना थक्क करत जोरदार षटकांची फटकेबाजी केली. यातच त्यांनी या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक केले. निकोलस पूरन यांनी १७ चेंडूत सहा षटकार आणि दोन चौकार मारले.

सनरायजर्सचे अब्दुल समद यांच्या एका षटकात तब्बल चार षटकार मारले. या षटकात त्यांनी २८ काढल्या. यामुळे संघाच्या धावा ६३ वरून थेट ९१ वर जाऊन पोहोचल्या. आयपीएलमध्ये १७ चेंडूत अर्धशतक बनवणारे निकोलस पूरन हे आठवे फलंदाज ठरले आहे.

याआधी ७ फलंदाजांनी १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. आता या यादीत निकोलस पूरन यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. ख्रिस गेल, हार्दिक पंड्या, ऍडम गिलख्रिस्ट, क्रिस मॉरिस, ईशान किशन, किरण पोलार्ड आणि सुनील नरेन यांनी आतापर्यंत १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयलच्या संजू सॅमसन यांनी जोरदार षटकार मारला, पण हा षटकार निकोलस पूरन यांनी चौकाराच्या बाहेर जाऊन उडी मारून अडवला, हे पाहून सर्व क्रीडा रसिक चकितच झाले. एक षटकार वाचवण्यासाठी निकोलस पूरन यांनी केलेले क्षेत्ररक्षण पाहून सर्वजण हैराण झाले.

महत्त्वाच्या बातम्या-

इलेक्ट्रिक कारमध्ये टाटांची बाजी; नेक्सॉननं रचला ‘हा’ सर्वात मोठा कारनामा!

लग्नाला 58 वर्षे झाल्यानंतर केले लग्नाचे फोटोशूट, कारण वाचून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू!

आर्थिक तंगीत 9 लाखाच्या हिऱ्यांची बॅग सापडली, कामगारानं जे केलं ते वाचून हैराण व्हाल!

मुकेश खन्ना यांनी अखेर ‘ते’ मोठं रहस्य उलगडलं; कपिल शर्माच्या शोमध्ये…

साऊथचे 7 जबरदस्त हिट हिंदी सिनेमे; हे पाहिले नाहीत तर काय पाहिलं?