‘निक रात्री मला झोपू देत नाही अन् रात्री उठून माझ्यासोबत…’; प्रियांका चोप्राचा पतीविषयी मोठा खुलासा!

मुंबई | बॉलीवूड मधील अनेक कलाकार त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांबर शेअर करत असतात. मोठ मोठे कलाकार सोशल मीडियावरून सतत आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी खुलेपणाने सांगतात. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास देखील सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी काही न काही शेअर करत असतात.

काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने एका वाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी तिने पतीविषयी अनेक महत्वाचे खुलासे केले होते. या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत प्रियांकाने हैराण करणारे खुलासे केले आहेत.

प्रियांकाने सांगितले की, निक डायबेटीजच्या आजारामुळे खूप परेशान असतो. अगोदर मला या आजाराबद्दल काहीच समजत नव्हते पण निक या आजाराबद्दल खूप संवेदनशील आहे.

तसेच निकच्या या आजारामुळे काहीवेळा तर मी रात्रभर झोपू शकत नाही. तसेच रात्री उठून अनेकवेळा मी निक ठीक आहे का? हे पाहत असते, असंही प्रियांकाने मुलाखती दरम्यान म्हटलं आहे.

प्रियांका पुढे म्हणाली की, निक खूप लहान होता तेव्हापासून त्याला हा आजार आहे. डायबिटीज हा एक खतरनाक आजार आहे. या आजारामुळे तो त्याच्या जिवनात खूपच अनुशासित राहतो. निक या आजारामुळे कधी घाबरून जात नाही. त्याच्या या सकारात्मक वृत्तीमुळे मला देखील खूप उर्जा मिळते.

दरम्यान, प्रियांका आणि निकने डिसेंबर 2018 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांनीही रितीरीवाजाप्रमाणे लग्न केलं होतं. जोधपुरच्या उम्मेद पॅलेसमध्ये हे लग्न पार पडलं होतं. तब्बल तीन दिवस प्रियांका आणि निकचं लग्न सुरु होतं.

लग्नानंतर काही दिवसांनी निक आणि प्रियांका न्युयोर्क मधील एका फॅशन शोमध्ये गेले होती. या शोमधील त्या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोजमुळे प्रियांका प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, ही निव्वळ अफवा असल्याचं प्रियंकाने स्पष्ट केलं होतं.

यावर स्पष्टीकरण देताना प्रियांका म्हणाली होती की, मी निकसोबत फॅमिली प्लॅनिंग करू इच्छित आहे. माझ्यासाठी सर्वात महत्वाचे कुटुंब आहे. पण यासाठी ही योग्य वेळ नाही. तसेच देवाच्या आशीर्वादाने हे सर्व होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पुनावाला यांची कोरोना लसीसंदर्भात मोठी घोषणा!

प्रेग्नन्सीनंतर अनुष्का चित्रपट सृष्टीला अलविदा करणार? अनुष्का शर्माचा मोठा खुलासा!

‘पुणेकरांनी शोधलेल्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये’; सुप्रिया सुळेंचा मोदींना इशारा

काय सांगता! महिनाभरात तब्बल इतक्या हजारांनी सोनं उतरलं

शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करणार? गृहमंत्री रोखठोक उत्तर देत म्हणाले…