देश

वडिल म्हणाले नापास झाली तर तुझं लग्नच लावून देतो; पोरीनं जिद्द ठेवली अन् IAS झाली!

गुरूग्राम |  स्पर्धा परीक्षांचा सातत्य ठेऊन अभ्य़ास करणं… घरच्या परिस्थितीचं आणि वैयक्तिक प्रॉब्लेम्स दूर सारत IAS सारख्या परीक्षेत देदिप्यमान यश मिळवणं तितकसं सोपं नाहीये. पण हीच कमाल केलीये गुरूग्राममधल्या निधी सिवाचीन हिने…!

निधीने 2018 मध्ये सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेत 83व्या क्रमांकावर यश मिळवलं आहे. या यशाचं श्रेय तिने कुटुंबाला दिलं आहे.

निधीच्या वडिलांनी ती शिक्षण घेत असताना तिच्यासमोर एक अट ठेवली होती. जर तू कोणत्याही परीक्षेत नापास झाली तर तूझं लग्न लावून दिलं जाईल. पण, वडिलांच्या या अटीमुळे ती मागे हटली नाही तर तिने मोठ्या धैर्याने अभ्यास केला आणि यशाला गवसणी घातली.

या परीक्षेसाठी निधीने कोणताही क्लास लावला नाही. तिने मेहनत घेत घरीच अभ्यास केला. अभ्सास करत असताना घरच्यांचं मला खूप सहकार्य लाभलं, असं ती सांगते.

निधीने 2015 साली मॅकेनिकल इंजिनिअरींगमधून आपली पदवी पूर्ण केली आहे. त्यानंतर काही दिवस तिने महेंद्रा टेकमध्ये नोकरी केली. परंतू अभ्यासासाठी तिने ती नोकरी सोडली आणि पूर्णवेळ अभ्यासात लक्ष घातलं.

दरम्यान, परीक्षेची संपूर्ण तयारी पूर्ण होत नाही तोपर्यंत घराचा दरवाजा पाहणार नाही असं निधीने ठरवलं होतं. अन् तीने ते करून दाखवलं.

IMPIMP