मुलाचा भाजपप्रवेश झाला मात्र वडील अद्याप वेटिंगवरच!

सिंधुदुर्ग | आज नितेश राणेंनी भाजपत प्रवेश केला. कणकवलीच्या भाजप कार्यालयात भाजपच्या सदस्यत्वाचा अर्ज भरत त्यांनी भाजपत प्रवेश केला. 

नितेश राणे आणि नारायण राणे कित्येक दिवसांपासून भाजपप्रवेशासाठी उत्सुक होते. मात्र त्यांच्या भाजपप्रवेशाला मुहूर्त सापडत नव्हता. मात्र आज अखेर नितेश राणेंनी भाजपत प्रवेश केला. 

नारायण राणे मात्र अजूनही भाजपच्या वेटींग लिस्टमध्ये आहेत. त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

1 ऑक्टोबला त्यांनी आपल्या काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला. आता पुढच्या काही तासात भाजपची तिसरी यादी जाहीर होईल. त्यात नितेश राणेंचं नाव असण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, नितेश राणे उद्या कणककवलीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

महत्वाच्या बातम्या-