आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमी घालातायेत गस्त!

मुंबई : ठाणेकर तरुण सध्या एमएमआरडीकडून मेट्रो प्रकल्पासाठी होणारी झाडांची कत्तल रोखण्यासाठी रात्री गस्त घालताना दिसत आहेत. झाडांसोबतच त्यावर असणाऱ्या घरट्यांची सुद्धा नोंद घेतली जात आहे. ठाण्यातील म्युज संस्थेने याबाबत पुढाकार घेतला आहे.

ठाणेकर रात्री झोपेत असतानाच एमएमआरडीएकडून झाडांची कत्तल झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.एका महिन्यापूर्वी आरेमध्ये रात्री वृक्ष तोड करण्याचा प्रकार घडला होता. यावर पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असताना पुन्हा हाच प्रकार घडल्याने पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या समस्येवर उपाय शोधण्यासाठी रात्री गस्त घालण्याचा पर्याय तरुणांनी स्वीकारला आहे. ठाण्यातील तीन हात नाका ते घोडबंदर या परिसरात ही गस्त घातली जात आहे. वृक्षतोड झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून तरुणांनी गस्त घालणे सुरू केल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

मुळात ही संकल्पना म्युज फाऊंडेशनची आहे, तरी शहरातील अनेक संस्था आणि तरुण त्यात भाग घेताना दिसत आहेत. याबाबत प्रशासनाला जाब विचारला असता दिवसा होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वृक्षतोड करण्यासाठी अडचणी निर्माण होतात, त्यामुळे ती राञी केली जाते, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-