कोरोनाच्या आकडेवारीत मोठा झोल आहे; निलेश राणेंचा आरोग्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबई |  महाराष्ट्रात तसंच देशात रोज नव्याने कोरोनाबाधितांची आकडेवारी येत असते. केंद्र पातळीवर आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करत असतात. तर राज्य सरकारच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे ट्विटरद्वारे ती आकडेवारी जाहीर करत असतात. मात्र आरोग्यमंत्र्यांच्या आकडेवारीत मोठा झोल असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे.

निलेश राणे यांनी राजेश टोपे यांचं 3 मे आणि 4 मे या दिवशीचं ट्विट त्यांच्या स्वत:च्या अकाऊंटवरून पोस्ट करत आकड्यांमधली तफावत दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच या ट्विटमधून आरोग्यमंत्र्यांच्या आकडेवारीत मोठा झोल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “तीन तारखेला 12974, चार तारखेला नवीन 771 केसेस वाढले पण चार तारखेचा आकडा 14541??? 12974 अधिक 771 वाढले तर आकडा असला पाहिजे 13745… आणि रोज 2000 हजार केसेस बरे होत आहेत तर टोटल नंबर ऑफ केसेस कमी का होत नाही??? मोठा झोल आहे.

दरम्यान, कोरोना रूग्णांच्या बाबतीतले आकडे राज्य शासन लपवत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर आता निलेश राणे यांनी आकडेवारीबाबतीतला संशय आला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-काश्मिरमधील शहीदांच्या कुटुंबावरही कुणीतरी फुले उधळा- संजय राऊत

-“हिंदू मुस्लिम राजकारण करणाऱ्यांनी कालच्या हल्ल्यातलं इन्स्पेक्टर काझी यांचं बलिदान विसरू नये”

-“मोदी सरकार अपयशी; मात्र जनतेला पटवून देण्यात आम्हाला यश आलं नाही”

-उ. प्रदेश सरकारची तिजोरी मालामाल; एका दिवसात तब्बल एवढ्या कोटींची मद्यविक्री

-विश्वास नांगरे पाटलांचे नाशकात वाईन शॉप बंद करण्याचे आदेश…