Top news महाराष्ट्र मुंबई

निलेश राणेंनी रोहित पवारांची काढली लायकी… दिली शेंबड्या पोराची उपमा

मुंबई |  भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन युवा नेत्यांमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चांगलीच जुंपली आहे. भाजप नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटरवर वॉर सुरू झालं आहे. आज तर निलेश राणेंनी रोहित पवारांची लायकीच काढली आहे. एवढ्यावरच निलेश राणे थांबले नसून रोहित पवारांना त्यांनी शेंबड्या पोराची उपमा दिली आहे.

कोरोनाच्या या कठीण काळात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. तसंच साखर उद्योग देखील अडचणीत आला आहे. या दोन्ही विषयांवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर पत्रं लिहिली. देवेंद्र फडणवीसांनी यावरून पवारांवर टीका केली होती. यानंतर रोहित पवार यांनी फडणवीसांना चांगलंच सुनावलं होतं. यानंतर निलेश राणे फडणवीसांच्या मदतीला धावून आले आहेत. आमच्या नेत्यांवर बोलण्याची तुझी लायकी आहे का? अशी टीका त्यांनी रोहित यांच्यावर केली आहे.

गल्लीतलं शेंबडं पोर लहान लहान गोष्टीसाठी कसं किर किर करत असतं… तसं एक शेंबडं माझ्या आजोबांच्या पत्रावर कोणी बोलू नका म्हणून किर किर करतंय… ह्या वांग्याची लायकी काय आमच्या नेत्यांवर बोलायची? कोपर्डीची घटना, मराठा क्रांती मोर्चे झाले पण हा लुक्का तेव्हा काही बोलला नाही, अशी जहरी टीका निलेश राणेंनी रोहित यांच्यावर केली आहे.

निलेश राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. त्यावेळी तनपुरे यांच्या मदतीला रोहित पवार धावून आले होते. त्यांनी निलेश राणेंना खडसावलं होतं. आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो, असं रोहित पवार म्हणाले होते.

रोहित पवार तनपुरे यांच्या मदतीला धावून गेल्यावर निलेश यांनी रोहित आणि प्राजक्त तनपुरे या दोघांवर देखील निशाणा साधला होता. बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझ काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला, असं प्रत्युत्तर त्यांनी रोहित पवारांना दिलं होतं.

निलेश राणेंची रोहित पवार यांच्यावर टीका-

 

 

 

 

रोहित पवार यांनी प्राजक्त तनपुरे यांना दिलेलं उत्तर-

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा, जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य”

-चाणाक्ष महिला सरपंच… मुंबईतून आलेल्या 6 जणांना घरातच कोंडलं, 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह!

-राज्यासाठी नेमकं काय करतोय याचं जरा आत्मपरिक्षण करा; रोहित पवारांचा फडणवीसांना सल्ला

-लोकांमध्ये विश्वास निर्माण करा, मंत्री अधिकाऱ्यांना कामाला लावा; पवारांचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

-‘खोटं बोलू नका’; काँग्रेसच्या त्या ट्विटवर अनुपम खेर संतापले