मुख्यमंत्र्यांना सुट्टीवरच राहुद्या कारण आल्यावरही ते गोट्याच खेळतील; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यावर बोचरी टीका

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाबळेश्वर येथे तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. झेपत नसेल तर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडा, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

जवळपास 3 महिने झाले आणि उद्धव ठाकरे 3 दिवस सुट्टीवर. काय मोठा पराक्रम केला ह्या तीन महिन्यात की यांना सुट्टी घ्यावी लागली, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

मी 1995 पासून ते 2019 पर्यंत 6 मुख्यमंत्री बघितले पण त्या पदावर असताना त्यांनी सुट्टी घेतलेली आठवत नाही, असं म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना सुट्टीवरच राहुद्यात कारण आल्यावरही ते गोट्याच खेळतील. कारण सगळे निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारच घेतात, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

अरबी समुद्रातील शिवस्मारक योजना रद्द करण्यासाठी याचिका दाखल

-लज्जास्पद! कामाला जा पैसे कमवून आण…, 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकललं

-“साध्वी प्रज्ञा मूर्ख आहेत, आमचं दुर्दैव की त्या आमच्याच पक्षात आहेत”

-पाकिस्तानी मंत्र्याची मोदींवर टीका; अरविंद केजरीवाल संतापले

-अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये रंगला बॅडमिंटन सामना; विखेंचीही उपस्थिती