मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सहकुटुंब अयोध्या दौरा केला. यावेळी राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेच्या वतीने 1 कोटी रुपये देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं. मात्र, यावरुन भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे.
लाज नाही वाटली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त एक करोड रुपये जाहीर करताना. मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45कोटी पण राम मंदिराला फक्त एक कोटी???, असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या काळात तिसऱ्यांदा अयोध्यावारी केली. तसेच मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा अयोध्येला गेले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यापासून शिवसेनेवर हिंदूत्व सोडल्याची टीका होत होती.
दरम्यान, अयोध्या दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांचं उत्तर प्रदेश सरकारनं जोरदार स्वागत केलं. तसे उत्तर प्रदेश सरकाने उद्धव ठाकरे यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“दिल्लीतील दंगलीमागे RSS आणि भाजपचा हात”
-‘उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा नाटक’; निलेश राणेंची बोचरी टीका
-मुख्यमंत्री होईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं-उद्धव ठाकरे
-मी भाजपला सोडलंय… हिंदुत्वाला नाही- उद्धव ठाकरे
-शिवसेनेच्या वतीने राम मंदिरासाठी 1 कोटी रूपये देणार- उद्धव ठाकरे