“उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे”; भाजप नेत्याची मोठी टीका

मुंबई | शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यापासून भाजपचे आमदार देखील शिंदे यांच्या पाठिशी उभे आहेत. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या भांडणात ते देखील तोंडसूख घेत आहेत.

आता भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टोकदार शब्दांत टीका केली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर रविवारी अमरावती येथे हल्ला करण्यात आला होता. यावर राणे यांनी निषेध नोंदवत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला.

उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे, हे मला वेगळे सांगण्याची गरज नाही, अशा शब्दांत निलेश राणे यांनी ठाकरेंवर टीका केली.

उद्धव ठाकरे असे पिसाळले आहेत की, त्यांना काय करावे सुचत नाही. आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचे काय करायचे, हे मला वेगळे सांगण्याची गरज नाही, असे देखील राणे म्हणाले.

संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यामुळे त्यांना चांगल्या शब्दांत आणि चांगल्या भाषेत सांगता येणार नाही, असे दिसते आहे. त्यांना फटकेच द्यायला पाहिजे, असे देखील राणे म्हणाले.

अमरावती येथे संतोष बांगर हे आपल्या पत्नी आणि बहिणीसोबत देवदर्शनासाठी गेले होते. यावेळी मंदिराच्या बाहेर त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला, त्यांनी त्यावेळी तेथून पळ काढला होता. त्यामुळे कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.

महत्वाच्या बातम्या –

रायगडावरील पिंडदानाचे हिंदुत्वादी संघटनाकडून समर्थन; म्हणाले, “संभाजी ब्रिग्रेडचा आरोप…”

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर उज्वल निकम यांचे भाष्य; न्यायालयाकडे प्रामुख्याने तीन प्रश्न आहेत ते म्हणजे…

“आज मुख्यमंत्री अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता”; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्तविली शक्यता

“शाळांमध्ये सरस्वती आणि देवींच्या फोटोएवजी महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत” – छगन भुजबळांच्या वक्तव्याने भाजप आक्रमक

“2014 ला मला उपमुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण…”; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट