“मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात”; मनोहर पर्रिकरांची आठवण काढत राणेंची टीका

मुंबई | राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांची प्रतिमा ही महत्त्वाची असते. सध्या राज्यात विधीमंडळ अधिवेशन चालू आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून राज्यात चांगलाच गोंधळ होतो आहे.

भाजपच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरण्यासाठी ठाकरे यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा लावून धरला आहे. परिणामी सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतूरा रंगला आहे.

कोकणातील शिवसेनेचे प्रतिस्पर्धी आणि भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. निलेश राणे यांनी आपल्या खास शैलीत टीका केली आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर परीकर मुख्यमंत्री असताना त्यांचे निधन झाले पण 1 दिवस सुद्धा घरी बसले नाही. कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी झुंजत असताना त्यांनी कधी कामामध्ये तडजोड केली नाही, शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात, अशी तुलनात्मक टीका राणे यांनी केली आहे. परिणामी राज्याच्या राजकारणत पुन्हा एकदा शिवसेना विरूद्ध राणे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

निलेश राणे यांनी मनोहर पर्रिकर यांचा दाखल दिला आहे. पर्रिकर हे गोवा भाजपचा चेहरा होते. भारताचे संरक्षणमंत्री म्हणूनही पर्रिकर यांनी काम केलं आहे. पण पर्रिकर यांच्याशी तुलना करून राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आजारावर बोट ठेवलं आहे.

निलेश राणे यांच्या टीकेनंतर आता शिवसेनेकडूनही राणे यांच्यावर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. अशात राणे आणि ठाकरे संघर्ष वाढणारं वक्तव्य राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून चर्चा झाल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती. भाजपनं नितीमत्ता सोडल्याचं आव्हाड म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या –

“यांना पाहून कुंभकर्णही म्हणेल, रिश्ते में ये हमारा बाप लगता है”

 रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा

“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”

‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल