महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना, त्यावर निलेश राणेंची खोचक टिप्पणी

मुंबई |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली राज्यातील व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी काही महत्त्वाच्या विषयावर सूचना केल्या तसंच अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये विश्वास निर्माण करा आणि त्यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांना कामाला लावा, असा कानमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. पवार यांनी दिलेल्या कानमंत्रावर भाजप नेते निलेश राणे यांनी खोचक टिप्पणी केली आहे.

साहेब…. आपण लोकांमध्ये विश्वास वाढवायच्या सूचना दिल्या पण विश्वास तयार नसेल लोकांमध्ये वाढायला तर आपण काय करायचं???, अशी टिप्पणी निलेश राणे यांनी केली आहे. राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. यावेळी दररोज ठराविक वेळ निश्चित करून शासनाने आवश्यक सवलतींची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. दुकाने, कार्यालये, खाजगी क्षेत्रातील आस्थापने टप्प्याटप्प्याने उघडली जातील, अशी प्रमुख सूचना पवारांनी केली.

लॉकडाऊनच्या काळआत लोकांमध्ये प्रचंड मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तो संभ्रम दूर करण्यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांना कामाला लावा. तसंच परिस्थिती नियंत्रणात येत असताना लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची देखील गरज आहे. म्हणून आता मंत्र्यांची उपस्थिती वाढणे आवश्यक असल्याचं पवार म्हणाले. कोरोना आपल्यातून लगेच जाणार नाही. आपल्याला त्याच्यासोबत जगण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

कोरोनाच्या या परिस्थितीत राज्य सरकारच्या त्रुटी दाखवण्याची एकही संधी निलेश राणे सोडनाता दिसत नाहीत. दररोज ट्विटच्या माध्यमातूनते राज्य सरकारला सवाल विचारत आहेत. खास करून मुख्यमंत्र्यांना त्यांनी गेल्या काही दिवसांपासून लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-राज्यासाठी नेमकं काय करतोय याचं जरा आत्मपरिक्षण करा; रोहित पवारांचा फडणवीसांना सल्ला

-लोकांमध्ये विश्वास निर्माण करा, मंत्री अधिकाऱ्यांना कामाला लावा; पवारांचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

-‘खोटं बोलू नका’; काँग्रेसच्या त्या ट्विटवर अनुपम खेर संतापले

-लॉकडाउनचा नियम मोडला; ‘या’ भाजप आमदारावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

-“बिरोबाच्या शपथेचं मी अन् बिरोबा बघून घेऊ; पवारांच्या बगलबच्च्यांनी मला सांगू नये”