Top news महाराष्ट्र मुंबई

सध्याच्या मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढलंय, म्हणून त्यांना काही फरक पडत नाही- निलेश राणे

मुंबई |  कोरोनाच्या परिस्थितीत शासनाच्या नियोजनावर आणि त्रुटींवर बोट ठेवत भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यावरून निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

राज्य सरकारकडे लाॅकडाऊन वाढवणे हा एकच उपाय आहे कारण बाकी सगळीकडे ते फेल झाले आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढले म्हणून त्यांना काही फरक पडत नाही पण परिस्थिती गंभीर आहे, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. ह्या सरकारकडे नियोजन नाही दूरदृष्टी नाही ह्याची सर्वाधिक  चिंता वाटत असल्याचंही निलेश राणे म्हणाले.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरूवारी झालेल्या सर्वपक्षीने नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. आपल्याला मे अखेरपर्यंत काळजी घेऊन प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही, असं मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले.

निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “राज्य सरकारकडे लाॅकडाऊन वाढवणे हा एकच उपाय आहे कारण बाकी सगळीकडे ते फेल झाले आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढले म्हणून त्यांना काही फरक पडत नाही पण परिस्थिती गंभीर आहे आणि ह्या सरकारकडे नियोजन नाही दूरदृष्टी नाही ह्यांची चिंता वाटते”

 

 

महत्वाच्या बातम्या-

-जितेंद्र आव्हाडांनी केली कोरोनावर मात

-आज आहे नारद जयंती; जाणून घ्या नारदाच्या जन्माची कथा आणि पूजेचं महत्त्व

-औरंगाबादच्या घटनेनं माझं मन सुन्न झालंय, रोहित पवार यांचं भावूक ट्विट

-औरंगाबादजवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; मालगाडीने 16 मजुरांना जागीच चिरडलं

-खडसे, बावनकुळे, पंकजा मुंडें यांना भाजपचा पुन्हा दे धक्का; विधानपरिषदेची उमेदवारी नाही?