‘आता सत्ता बदलली, आता गाठ माझ्याशी आहे’, निलेश राणेंची अधिकाऱ्यांना तंबी

सिंधुदुर्ग | 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकार पडलं व नवी शिंदे सरकार सत्तेत आलं. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून अनेक राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.

सत्तेत येताच शिंदे सरकार अॅक्शनमोडमध्ये आलं असून महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय शिंदे सरकारने रद्द केले. त्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी देखील नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

निलेश राणे यांनी मालवण नगर परिषदेत धडक मोर्चा काढत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तसेच तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात का?, असा सवाल देखील विचारला.

मालवण नगरपरिषद कार्यक्षेत्रात मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गटार साफसफाईत हलगर्जीपणा केल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरलं. यावरून नागरिकांनीही तीव्र नाराजी दर्शवली.

यानंतर निलेश राणे यांनी नगरपरिषदेत जात अधिकाऱ्यांना थेट तंबी दिली आहे. निलेश राणेंनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गेंना सर्वांसमोर धारेवर धरलं.

आम्ही सत्तेत नव्हतो तेव्हा गप्प बसलो. पण आज टेबल फिरलेत आणि आमची सत्ता आहे. त्यामुळे गाठ माझ्याशी आहे, असे खडेबोल निलेश राणेंनी सुनावले आहेत.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांसोबत मिळून मालवण शहराची वाट लावली असल्याचा आरोप देखील निलेश राणेंनी केला आहे. तर टेबलावरचं निवेदन उचलून लवकर नागरिकांची कामं करा, असंही निलेश राणे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

शनिवार-रविवार फिरायला बाहेर पडताय?, पुणेकरांनो या गोष्टीमुळे वाढेल तुमची डोकेदुखी!

हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्याला धोक्याचा इशारा; पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज 

“माझा राजीनामा माझ्या खिशात, दबावाखाली काम करणार नाही”; ‘या’ नेत्याचा मोदींना इशारा 

जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; जिओकडून नव्या धमाकेदार प्लॅनची घोषणा 

‘पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल…’; शरद पवारांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला