केसेस रद्द करण्यात कसली आलीये हुशारी- निलेश राणे

मुंबई |  विधानसभा निवडणुकीच्या काळात आरेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. तत्कालिन सरकारने रातोरात आरेमधल्या झाडांची कत्तल केली होती. यालाच पर्यावरण प्रेमींनी जोरदार विरोध दर्शवला होता. त्यावेळी सरकारने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. मात्र नव्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर केसेस रद्द करण्यात कसलीच हुशारी नाही, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ट्वीट करून त्यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला होता. परंतू काही क्षणांत त्यांनी हे ट्वीट डिलीट केलं.

घरात जनावर, निसर्ग प्रेमी आहे म्हणून मुख्यमंत्र्यानी आरेच्या केसेस माघे घेतल्या. महाराष्ट्रात अनेक आंदोलनं झाली पण त्यांच्यातला कोणी मुख्यमंत्र्यांच्या घरातला माणूस न्हवता म्हणून ते अडकले, असं ट्वीट करून निलेश यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

केसेस रद्द करण्यात कसलीच हुशारी नाही पण आता मेट्रोच्या नवीन जागेसाठी पैसे मोजावे लागतील, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी नितेश आणि निलेश राणे सोडत नाहीयेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-