…म्हणून नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार

मुंबई | शिवसेनेवर घणाघाती टीका करणारे भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे. मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनामधील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतल्याने मुख्यमंत्र्यांचे आभार, असं राणे म्हणाले आहेत.

मी एक दिवसाअगोदरच ज्याप्रमाणे आरे प्रकरणातील गुन्हे मागे घेतले, तसेच नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले होते. मुख्यमंत्र्यांनी माझे ऐकले, यापुढेही त्यांनी माझं ऐकत रहावं, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे.

नाणार प्रकल्पाला विरोध करणारे तेथील  सर्वासामान्य लोक होते. त्यावेळी गृहराज्यमंत्री राहिलेले शिवसेनेचे नेते दिपक केसरकर यांनीच त्यांच्यावर गुन्हे टाकले होते. त्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी हे गुन्हे मागे घेतले आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारल्यापासून निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. त्यांनी आरे पाठोपाठ नाणार आंदोलनामधील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-