मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद प्रचंड गाजत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेवर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जोरदार प्रहार केले आहेत.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आम्हाला त्रास दिला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता राज्यात मोठा वाद पेटला आहे.
नारायण राणेंनी शिवसेना नेते संजय राऊत आणि मिलींद नार्वेकर यांना उत्तर दिल्यानंतर आता माजी खासदार निलेश राणे भाजपकडून मैदानात उतरले आहेत. राणेंनी शिवसेनेवर आणि काॅंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबियांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्याचाही समाचार निलेश राणेंनी घेतला आहे. निलेश राणेंनी यावेळी काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
विनायक राऊत यांचा इतिहास कच्चा आहे. अशोक चव्हाण यांच्या राजकीय खेळीनं आम्ही काॅंग्रेस सोडल्याचा गौप्यस्फोट राणेंनी केला आहे. राणेंच्या आरोपांनी आता राज्यात खळबळ माजली आहे.
आमच्या विरोधात अशोक चव्हाण दिल्लीत चुकीची फिल्डींग लावत होते. परिणामी कंटाळून आम्ही काॅंग्रेस सोडली, तेव्हा अशोक चव्हाण तसे वागले नसते तर आम्ही तो निर्णय घेतला नसता, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.
निलेश राणेंनी शिवसेना नेते विनायक राऊत, मिलींद नार्वेकर, संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परिणामी शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निलेश राणेंनी आपला मोर्चा काॅंग्रसेकडं वळवल्यानं शिवसेना आणि राणेंच्या वादात काॅंग्रेस देखील सापडली आहे. अशात आता अशोक चव्हाण यांच्याकडून काय उत्तर येतं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या
“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”
अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!
“आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे”
‘संजय राऊत महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक, त्यांना….’; तुषार भोसले भडकले