“…हिशोब इथेच चुकते करणार”; निलेश राणे आक्रमक

मुंबई | शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यात फक्त भ्रष्टाचार करत आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर राज्यात वातावरण तापलेलं आहे. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार वाद रंगला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संगनमतानं तपास यंत्रणा काम करत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली होती.

राऊत यांच्या टीकेनंतर भाजपकडून त्यांच्यावर जोरादार टीका करण्यात येत आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरादार टीका केली आहे.

नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता शिवसेना आणि राणे कुटुंबातील वाद वाढला आहे.

भाजप नेते आणि नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. निलेश राणेंनी ट्विट करत शिवसेनेला इशारा दिला आहे. परिणामी सध्या राणेंच्या ट्विटची सर्वत्र चर्चा होत आहे.

किती खालच्या थराचं राजकारण चाललंय महाराष्ट्र बघतोय, सत्ता कधी कायमची नसते काही लोकं विसरलेत. आमचा दुसऱ्या जन्मात विश्वास नाही सगळे हिशेब ह्याच जन्मात चुकते करणार,जय शिवराय, असा इशारा राणेंनी शिवसेनाला दिला आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. राणे यांच्या टीकेला शिवसेनेकडून काय उत्तर मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “सशक्त सरकारने सशक्त कारवाई करणे अपेक्षित आहे”; वरूण गांधींचा सरकारला घरचा आहेर

  ‘मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की…’; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

  Kirit Somaiya: “किरीट सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी”

  येत्या दोन दिवसांत ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

  राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचं सावट, ‘या’ ठिकाणी अनेक पक्षांचा मृत्यू