“महाराष्ट्र पोलिसांनी पण यातून काही शिकलं पाहिजे”

मुंबई | हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर हैदराबाद पोलिसांनी केला. यावर महाराष्ट्र पोलिसांनी पण हैदराबाद पोलिसांनी  केलेल्या कामगिरीतून  काही शिकलं पाहिजे, असं माजी मुख्यमंत्री  नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

ह्याला म्हणतात न्याय अश्या हरामखोरांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजे. महाराष्ट्राच्या पोलिसांनी पण ह्यातून काही शिकलं पाहिजे, कोपर्डीची घटना पण अशीच होती पण ते हरामी आजही सरकारचं खातायत. सगळ्याच बलात्काराच्या केसेस मध्ये हीच शिक्षा झाली पाहिजे, असं ट्वीट करत निलेश राणे यांनी हैदराबाद पोलिसांचं कौतूक केलं आहे.

नराधमांनी दिल्लीची, कोपर्डीची निर्भया, नयना पुजारी अशा किती निष्पाप जिवांचा बळी घेतला. आजही त्यांच्या आई-वडीलांच्या डोळ्यातलं पाणी खळत नाही. तेव्हाही नराधमांना असंच ठोकलं असतं तर अशी पुनरावृत्ती टळली असती, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनेकांनी या एन्काउंटरप्रकरणी पोलिसांचं अभिनंदन केलं असून काहींनी या एन्काउंटरबद्दल संक्षय व्यक्त केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-