एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीरपणे काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं- निलेश राणे

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत पवारांनी फटकारलं हे वाचून आणि ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितलं, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी हे जाहीर करावं की हा राग पार्थने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली म्हणून?, असा सवालही निलेश राणेंनी पवारांना केला आहे.

दरम्यान, शरद पवार हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबातील प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार आहे. त्यात वावगं असं काही नसून पवार कुटुंबात कोणतेही वाद नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! मतिमंद मुलीवर बलात्कार; सहा महिन्यानंतर ‘अशा’ प्रकारे सत्य आलं समोर

मी एक संवेदनशील व्यक्ती आहे, काही चूक झाली, तर मी माफी मागायला तयार- संजय राऊत

धक्कादायक! आईचं वात्सल्य हरवलं; शुल्लक रकमेसाठी आपल्या पोटचा गोळा विकला

“मोदी है तो मुमकीन है”; राहुल गांधी पुन्हा कडाडले

दादा नाराज नाहीत, शरद पवार कुटुंबप्रमुख आहेत त्यांना प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार- जयंत पाटील