‘आदित्यला आक्रमक दाखवण्याचा प्रयत्न, पण कार्टुनमध्येही…’; निलेश राणेंचा टोला

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर राजकीय हालचालींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे व शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या मनधरणीचे अनेक प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आले.

शिवसेनेनं अनेक प्रयत्न करूनही बंडखोर आमदार त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आता शिवसेना बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे देखील एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत.  गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीका करत आहे.

आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेवरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. निलेश राणेंनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर खोचक शब्दात टीका केली आहे.

काही मीडिया चॅनेल आदित्यला आक्रमक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

कार्टुनमध्ये पण माऱ्यामाऱ्या दाखवतात. मात्र, ते बघून आपल्याला हसायला येतं, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

दरम्यान, शिंदे गटातील आमदारांना जबरदस्ती गुवाहाटीला नेण्यात आलं असल्याचा आरोप सातत्याने आदित्य ठाकरे करत आहेत. तर एकनाथ शिंदेंनी आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आजचा शेवटचा दिवस असेल…’; बंडखोर आमदाराचा गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंना इशारा

“तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाही, मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही मग राज्य कोण चालवतंय?”

“येत्या दोन तीन दिवसात भाजपचं सरकार येईल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”

मंत्र्यांची खाती काढल्यानंतर ठाकरे सरकारने उचललं आणखी एक मोठं पाऊल!

“दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच वेळ, महाराष्ट्राला दाखवून द्या की…”