सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत निलेश राणेंचा सरकारचा गंभीर आरोप; जस दिवस जात आहेत तसे…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह मृत्युच्या प्रकरणावरून बराच गदारोळ चालू आहे. सुशांतच्या आत्महत्येवरून राजकीय वातावरण तापलं आहे. आता काही वेळापुर्वी विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांतच्या आत्महत्येबाबत मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह करण्यासारखं ट्विट केलं. मात्र आता भाजप नेते निलेश राणे यांनीही ट्विट करत सरकारवर या प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत.

दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटायला जातात. त्यानंतर लगेच आज पोलीस आयुक्त पत्रकार परिषद घेतात. काहीतरी गडबड आहे हे न समजण्याइतकी लोकं मूर्ख नाहीत. जसे दिवस जात आहेत तसे टी गँग पुरावे नष्ट करत आहे. म्हणून रोज धडपड सुरू आहे, अशी शंका निलेश राणे यांनी उपस्थित केली आहे.

अपघाती मृत्यूची नोंद करुन मुंबई पोलिसांनी आधीच तपास सुरु केला आहे. आम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट, डॉक्टरांच्या टीमचा सल्ला घेतला आहे. नैसर्गिक मृत्यू आणि संशयास्पद मृत्यू या दोन्ही बाजूने मुंबई पोलिस तपास करत आहेत, असं मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबाचा जबाब नोंदवला आहे. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. आमचा तपास सुरू आहे. परंतु पोलीस निष्कर्षावर पोहोचलेले नसल्यांचही परमवीर सिंह यांनी सांगितलं.

 

महत्वाच्या बातम्या-