“भारतात रेस्टॉरंट च्या लायसन्सपेक्षा बंदुकीचं लायसन्स मिळवणं सोपं”

नवी दिल्ली | भारतात रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी लायसन्स मिळवण्यापेक्षा बंदूकीचं लायसन्स मिळवणं सोपं असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हे लायसन्स राज बंद करणं महत्त्वाचं असल्याचं मत सीतारमण यांनी म्हटलं आहे.

जगभरात हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करणं हे रोजगार आणि विकासाचं महत्त्वाचं घटन असल्याचंही उदाहरण सर्वेक्षणात देण्यात आलं आहे. भारतात मात्र, रेस्टॉरन्ट सुरु करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, याला सीतारामन यांनी दुजोरा दिला आहे.

आमचं सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटीबद्ध आहे. शेती व्यवसायाला स्पर्धात्मक बनवत शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित केलं जाईल, असं सीतारामन म्हणाल्या.

देशातील नागरिकांकडे रोजगार असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळेच हा अर्थसंकल्प त्यांचं उत्पन्न निश्चित करणारं आणि त्यांची क्रयशक्ती वाढवणारं असेल, असंही सीतारामन यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-जगात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ, चीनमधून 324 भारतीय मायदेशी

-जितेेेंद्र आव्हाडांच्या साथीने शरद पवारांनी मारला झणझणीत कोंबड्यावर ताव!

-सरकार एलआयसीमधील मोठा हिस्सा विकणार- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

-“आता शेलारांना काही कामच उरलं नाही म्हणून ते टिंगलटवाळगी करत सुटले आहेत”

-लोकेश राहूलने मोडला रनमशिन कोहलीचा ‘तो’ विक्रम