‘2025 पर्यंत देशातून टी.बी आजाराला कायमचं हद्दपार करणार’; इंद्रधनुषमध्ये 12 आजारांचा समावेश

नवी दिल्ली | सरकारने टी.बी. हारेगा… देश जितेगा ही मोहिम सुरू केलीये. या मोहिमेच्या अंतर्गत 2025 पर्यंत सरकार  देशातून टी.बी आजाराला कायमचं हद्दपार करेल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत.

मिशन इंद्रधनुषचा आवाका वाढवून त्यात नवीन 12 आजारांचा समावेश केला आहे. या इंद्रधनुष योजनेमध्ये 5 नवीन लसीकरणांचा देखील समावेश करण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं आहे.

2024 पर्यंत देशातील प्रत्येक जिह्यात जन औषधी केंद्र उभारण्याचं सरकारचं उदिष्ट असल्याचं देखील अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे. तसंच पीपीपी तत्वावर देशात नवी रूग्णालयं उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

2020 आणि 2021 मध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी 12,300 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

-जगात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ, चीनमधून 324 भारतीय मायदेशी

-जितेेेंद्र आव्हाडांच्या साथीने शरद पवारांनी मारला झणझणीत कोंबड्यावर ताव!

-सरकार एलआयसीमधील मोठा हिस्सा विकणार- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

-“आता शेलारांना काही कामच उरलं नाही म्हणून ते टिंगलटवाळगी करत सुटले आहेत”

-लोकेश राहूलने मोडला रनमशिन कोहलीचा ‘तो’ विक्रम