देशातील 10 सरकारी बँकांचं विलिनीकरण; निर्मला सितारामन यांची घोषणा

नवी दिल्ली : अर्थवेवस्थेला चालना देण्यासाठी देशातीली 10 बँकांच विलिनीकरण 4 मोठ्या बँकांमध्ये करणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली आहे. विलिनीकरणानंतर सरकारी बँकांची संख्या 27 वरुन 12 पर्यंत येईल. त्यामुळे आता देशात एकूण 12 राष्ट्रीय बँका असतील.

पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचं विलिनीकरण होऊन देशातील सर्वात मोठी दुसरी बँक अस्तित्वात येईल. या बँकेची उलाढाल 17.95 लाख कोटी रुपयांची असेल, असं निर्मला सितारामन यांनी सांगितलं आहे. 

कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचंही विलिनीकरण होउन सर्वात मोठी चौथी बँक अस्तित्वात येईल आणि या बँकेंची उलाढाल 15.20 लाख कोटींची असेल, असंही त्या म्हणाल्या.

याशिवाय युनियन बँकमध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं विलिनीकरण होईल, ज्यामुळे देशातील पाचवी मोठी बँक अस्तित्वात येईल. तर इंडियन बँक, अलाहाबाद बँक यांचं विलिनीकरण होऊन 8.08 लाख कोटींची उलाढाल होईल, असं सितारामन यांनी म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-