Budget 2022 | मोदी सरकारने महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 3 मोठ्या घोषणा

नवी दिल्ली | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेसमोर मांडला आहे. देशाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे.

अर्थसंकल्प सादर करताना सितारमण यांनी तरूण, युवा उद्योजक, महिला, शेतकरी या घटकांना जास्त महत्त्व देत असल्याचं सांगितलं आहे. परिणामी या सर्व घटकांच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे.

देशातील महिला सबलीकरणासाठी सितारमण यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. महिलांसाठी तीन मोठ्या आणि आकर्षक घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत.

महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम आंगणवाडी आणि पोषणा आहार 2.0 यासांरख्या योजनांना व्यापक स्वरूप देणार असल्याचं सितारमण यांनी घोषित केलं आहे.

देशातील 2 लाख अंगणवाड्यांना अपग्रेड करणार असल्याचं सितारमण यांनी घोषित केलं आहे. महिला आणि बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे.

मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला जाईल. सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं वक्तव्य सितारमण यांनी केलं आहे.

देशातील सर्वात शक्तीशाली महिला म्हणून फोर्ब्स या नियतकालिकानं काही महिन्यांपूर्वी सितारमण यांचा गौरव केला होता. परिणामी सितारमण यांनी महिलांच्या बाबतीत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

दरम्यान, महिला सुरक्षेवर देखील सरकार भर देत असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारनं घोषणा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Budget 2022 | मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?, जाणून घ्या एका क्लिकवर

क्रिप्टोकरन्सी विकत घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने केली मोठी घोषणा 

Budget 2022 | विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारने केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा 

Budget 2022 | ‘इतके लाख नवे रोजगार निर्माण करणार’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा 

Budget 2022 | देशाची अर्थव्यवस्था सावरतेय, सामान्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न- निर्मला सितारमण