Top news महाराष्ट्र मुंबई

“त्या फॉर्ममुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत, सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावं”

मुंबई |  लॉकडाऊमुळे मुंबई आणि पुण्यात अनेक मजूर अडकून पडले आहेत. आपापल्या घरी जाण्याचे त्यांना वेध लागले आहेत. अशावेळी त्यांच्या प्रवासासंबंधी निर्णय घेताना शासनाचा जरासा गोंधळ उडलेला पहायला मिळत आहे. याप्रकरणीच भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे.

राज्य सरकारने एकदाच काय ते मुंबईमध्ये राहणारे चाकरमानी यांच्याबदल धोरण निश्चित करावे.. जिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म.. कधी नाव मागितली जात आहेत.. कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेत.. त्यामुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत. सरकार नी उशीर होणाया आधी स्पष्टीकरण द्यावे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

राज्य शासनाच्या सुधारित नियमानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआर) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील (पीएमआर) नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात किंवा अन्य जिल्ह्यातून या क्षेत्रात येण्याची परवानगी मिळणार नाही. सरकारच्या या निर्णयावरच प्रशासनाने एक काय ती भूमिका जाहीर करावी. नागरिकांना गोंधळात टाकू नये, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊनमुळे पुण्यात आणि मुंबईत अडकलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या नागरिकांना आपल्या घराकडे जाण्याचे वेध लागले होते. मात्र शासनाच्या नव्या निर्णयाने आता संबंधितांना वेटिंग करण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-आम्ही स्वबळावर लढलो असतो तरी आम्ही 144 चा आकडा गाठला असता- देवेंद्र फडणवीस

-कोरोनाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले; 24 तासात वाढले ‘एवढे’ रुग्ण

-निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी, शिवसेनेचं सगळं ठरलं होतं- देवेंद्र फडणवीस

-ब्युटी पार्लर आणि सलूनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

-…तोपर्यंत रेल्वे स्थानकावर गर्दी करु नका; रेल्वे प्रशासनाचं आवाहन

IMPIMP