“24 तास पोलिसांना सुट्टी द्या, मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल घालतो…”

पुणे | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापूर्वी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आमने सामने आले होते.

पोलिसांनी यावेळी लाठीमार देखील केला होता. भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा तिथं आला असता एका अज्ञात व्यक्तीनं या गोंधळात देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या दिशेन चप्पल भिरकवल्याची घटना घडल्यानं पिंपरीमध्ये खळबळ उडाली आहे. हा मुद्दा जास्त तापण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या घटनेवरून भाजप नेते नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत, त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात ते आम्ही बघतो. त्यांना जागोजागी चप्पलांचा हार घालतो मग चप्पला मोजायचे काम त्यांनी करावं, यानंतर भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.

दरम्यान, आपल्याला मुंबई महानगरपालिका निवडणूकीचे युद्ध जिंकायचे असून मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता का गरजेची आहे हे लोकांना समजवून सांगा म्हणत त्यांना मुंबईचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे तुम्हाला करायचं आहे अशा सूचना कार्यकर्त्याना नितेश राणेंनी केल्यात.

नितेश राणे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करुन बाळासाहेब ठाकरे नसते, भाजपची सत्ता आणि आरएसएस नसती तर हिंदुत्व टिकलं नसतं, असं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या- 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; सरकार हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

“बाळासाहेबांनतर हिंदूह्रदयसम्राट पदवी देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी”

“काहींनी सांगितलं मी येणार मी येणार, पण आम्ही काय येऊन देतो का?”

BMC चा नारायण राणेंना दणका! पुन्हा बजावली नोटीस 

  Pune: चप्पल फेकी प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…