सिंधुदुर्ग | राज्यासह देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारं संतोष परब हल्ला प्रकरण कोकणात कणकवलीमध्ये घडलं होतं. या प्रकरणात भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचे प्रमुख सतीश सावंत हे होते. त्यांच्या प्रचाराची सर्व धुरा ही शिवसैनिक संतोष परब यांच्यावर होती.
संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये हल्ला झाला होता. परब यांच्या तक्रारीनंतर आमदार नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला होता.
राणे यांनी जिल्हा न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केले पण सर्वोच्च न्यायालयानं देखील त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला होता.
सर्व प्रयत्नानंतर शेवटी नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण गेले आहेत. परिणामी राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या प्रकरणात राणे यांच्यासाठी न्यायालयात सोमवारी परत सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयानं राणे यांना 10 दिवसांचा दिलासा दिला आहे. परिणामी सिंधुदुर्ग न्यायालयानं या प्रकरणातील पुढची सुनावणी ही सोमवारी ठेवली आहे.
सरकारी वकीलांनी यावेळी ऑनलाईन पद्धतीनं सहभाग घेतला होता. तर नितेश राणे वकिलांसमवेत न्यायालयात हजर झाले होते. सरकारी वकील खूपच काम करत आहेत, असा टोला राणेंच्या वकिलांनी लगावला आहे.
दरम्यान, राणे यांना 10 दिवस अटकेपासून संरक्षण दिल्यानं त्यांना सध्या अटक करण्यात आलेली नाही. पण आता सिंधुदुर्ग न्यायालय काय निर्णय घेतं यावर या प्रकरणाचं आणि राणेंच्या अटकेचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अखेर समंथा नागा चैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने सोडलं मौन, म्हणाला “समंथाला…”
महाराष्ट्राच्या चित्ररथावरून वाद, सोशल मीडियावर नाराजीचा सूर
पदोन्नती आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
12 आमदारांचं निलंबन रद्द! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
BREAKING: ठाकरे सरकारला मोठा धक्का, 12 आमदारांचं निलंबन अखेर रद्द