मुंबई | शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडाळीनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व तत्कालिन महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
एकनाथ शिंदेंचा बंड ते महाराष्ट्रातील सत्तापालट अशा अनेक राजकीय घडामोडी गेल्या काही दिवसात घडल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनापक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.
ही मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. खासदार राऊत यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
या मुलाखतीवरून आता भाजप आमदार नितेश राणे यांनी तुफान टोलेबाजी केली आहे. मुळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख आहेत का?, असा खोचक सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.
माझ्या माहितीप्रमाणे खरी शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यामुळे उरल्या सुरल्यांचं काय ऐकायचं, अशी बोचरी टीका नितेश राणेंनी केली.
संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्रात काय वजन आहे? संजय राऊत बेरोजगार आणि उद्धव ठाकरे घरीच बसून असतात त्यामुळे फावल्या वेळात मुलाखत घेतली, असा टोला नितेश राणेंनी लगावला.
दरम्यान, शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंवर चौफेर टीका झाली. मात्र, त्यात राणे पिता-पुत्रांनी सेनेला व उद्धव ठाकरेंना अक्षरश: धारेवर धरलं. राऊतांनी घेतलेल्या या मुलाखतीवरून देखील नितेश राणेंनी खोचक शब्दात टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही”
“मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं”
मोठी बातमी! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचा मृत्यू
शिंदे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ प्रकरणांचे तपास महाराष्ट्र पोलिसांच्या हातून काढले
प्रसिद्ध गायक अदनान सामीनं उचललं धक्कादायक पाऊल; चाहतेही झालेत हैराण