नितेश राणे अज्ञातवासात?, नारायण राणे म्हणतात…

मुंबई | सिंधुदुर्गात पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) विरुद्ध राणे संघर्ष पेटला आहे. कणकवलीत संतोष परब या शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांनीच नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता वर्तवली आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणी नितेश राणेंना अटक करण्याची मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचे सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात थेट सामना होत आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणात सत्ताधारी आघाडी नितेश राणेंना गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. तर राणेंच्या आरोपांनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी या हल्ला प्रकरणातल्या सूत्रधारावर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात मोर्चा काढायचं ठरवल्यानं शिवसेना आणि राणे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. यावर नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

कसल्या अटकेबद्दल? काय केलंय नितेश राणेंनी? काही संबंध नसताना केवळ सूडाच्या भावनेतून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत, असं नारायण राणेंंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा पराभव होईल म्हणून सूडाच्या भावनेतून कारवाई होऊ शकते. केस टाकली की अटक होणार हे काही माहीत नाही, असं राणेंनी सांगितलं.

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांना काल तिसऱ्यांदा चौकशीसाठी कणकवली पोलिसांनी बोलावलं होतं. मात्र नितेश राणे चौकशीला आले नाहीत. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्या घरीही सिंधुदुर्ग पोलीस गेले. मात्र तिथेही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे नितेश राणे यांच्या चौकशीसाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी गोव्यातही फिल्डींग लावल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“…नाहीतर शशी थरूर यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल” 

‘मोहनदास करमचंद गांधीनं सत्यानाश केला’; कालीचरण महाराजाचं वादग्रस्त वक्तव्य 

विषारी साप मला तीन वेळा चावला, सापाने मला बर्थडे गिफ्ट दिलं- सलमान खान 

‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोना, वेळीच व्हा सावध! 

“…तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो”