मुंबई | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावरून आता नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
अटकेची टांगती तलवार लटकलेली असताना नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने नितेश राणेंच्या अंतरिम जामीनाची मागणी फेटाळून लावली.
त्यानंतर आता पोलीस नितेश राणे यांच्या शोधात आहे. अशातच आता राणे कुटुंबीयांची पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेने आता टीकास्त्र सोडलं आहे.
जामीन अर्जासाठी नितेश राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण, त्यांना त्यांचे वडील नारायण राणे यांनीच लपवून ठेवलं आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी आता न्यायालयासमोर हजर करायला पाहिजे. नितेश राणे कुठं आहेत हे त्यांच्या कुटुंबीयांना माहीत आहे. त्यांचं नितेश राणे यांच्यासह दररोज बोलनंही होतंय, असंही नाईक म्हणाले आहेत.
नारायण राणे सध्या केंद्रात मंत्री असल्यानं नितेश राणेंना लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनीच नितेश राणेंना लपवलं आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, प्रमोद वायगणकर नसल्यानं आमचा पराभव झाला होता. वायगणकर कुणामुळं बेपत्ता हे आधीच सांगितलं आहे. त्यांच्या बेपत्ता होण्यामागं कोण होतं हे सर्वांना माहीत आहे, असं म्हणत त्यांनी राणे कुटुंबीयांवर हल्लाबोल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इस प्यार को क्या नाम दू! भर रस्त्यात तरुण-तरुणीचे अश्लील चाळे, पाहा व्हिडीओ
घरभाड्याच्या बदल्यात सेक्स, ‘या’ देशात वेगानं वाढतोय हा ट्रेंड!
फिरायला आलेल्या तरुणीवर तीन मित्रांचा बलात्कार, अत्यंत धक्कादायक घटना
मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!
कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…