मुंबई | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावरून आता नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. (Nitesh Rane not reachable)
या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीत अटक केली आहे. त्यानंतर आता नितेश राणे यांच्या अटकेची मागणी होत आहे.
अशातच अटकेची टांगती तलवार लटकलेली असताना नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता नितेश राणे नाॅट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.
नितेश राणे यांच्या वकिलांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला आहे. त्यावर आता उद्या सुनावणी होणार आहे.
अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे नागपूरातील एक कार्यक्रम अर्धवट उरकून तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.
नागपुरातील कृषी प्रदर्शनात नारायण राणे यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर नितेश यांच्याविषयी माहिती मिळताच नारायण राणे तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.
नितेश राणे यांना कालदेखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी नितेश राणे चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे आता पोलीस नितेश राणे यांच्या घरी देखील गेले होते. त्यामुळे आता पोलीस नितेश राणेंचा शोध घेत आहेत.
दरम्यान, कणकवलीमध्ये घडलेल्या मारहाणीमध्ये आमदार नितेश राणे यांना गोवण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा गैरवापर केला जातोय, असे आरोप काल नारायण राणे यांनी केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
…अन् अशोक चव्हाण वैतागून म्हणतात,”तुम्हाला नेमकं काय पाहिजे?”
लहान मुलांचंही लसीकरण होणार, अशी करा तुमच्या मुलांची नोंदणी
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत
‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं