ना भावाला मंत्रिपद, ना स्वत: संपादक…; आजच्या सामनातल्या टीकेला राणेपुत्राचं सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई |  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखामधून राधाकृष्ण विखे पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. राणेंवरील टीका त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या जिव्हारी लागली आहे. आमदार नितेश राणे यांनी देखील राऊत यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.

ना भावाला मंत्रिपद, ना स्वत: संपादक… अशा शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. ‘सामना’च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत..‬ पवारांना भेटले कि फडणवीसांबद्दल उलट बोलायचं..‬ ‪राणेंना भेटले कि ठाकरेंबद्दल उलट बोलायचं..‬ ‪ठाकरेंना राणेंबद्दल उलट बोलायचं..‬ राज्यपाल भेटले कि पवारांबद्दल उलट बोलायचं..‬ असं करून स्वतःची आज किंमत कमी करून घेतली, अशा शब्दात त्यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करून आज सकाळी राऊत यांनी अग्रलेखातून केलेल्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सामना’च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत, असा बोचरा वार त्यांनी केला आहे.

सामनाचं आमच्यावर प्रेम आहे.. असणारच.. का नाही असणार…. शेवटी Old is gold! काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता पण ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारायचं पण नाही.. काही ‘पत्र’आहेत माझ्या कडे.. तळकोकणच्या प्रहार मधुन लवकरच छापतो.. मग बघु कशी कुरकुर होते, असं आव्हान देखील नितेश राणे यांनी राऊत यांना दिलं आहे.

दरम्यान,  राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत, अशा शब्दात राणे यांनी विखे आणि राणेंवर टीका केली होती.

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

-भारतात कोरोनाचा थयथयाट… पाहा गेल्या 24 तासांतली धक्कादायक आकडेवारी

-धनंजय मुंडे ठरले ‘सक्सेसफुल’… कोरोनाला हरवून आज घरी परतणार!